For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुतीनगरातील युवकाची तीन लाखांची फसवणूक

06:30 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मारुतीनगरातील युवकाची तीन लाखांची फसवणूक
Advertisement

एपीके फाईलच्या माध्यमातून सायबर क्राईम

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

एपीके फाईल पाठवून मारुतीनगर येथील एका युवकाच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 3 लाख रुपयांहून अधिक रक्कम हडप केली आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

राजेश्वर राठोड (वय 33) या युवकाने सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. राजेश्वरच्या व्हॉट्सअॅपवर पीएम किसान योजना, आरटीओ इन्फोचलन, मुका व अ•ा-52 या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली होती. राजेश्वर यांनी ही एपीके फाईल ओपन करताच त्यांचा मोबाईल हँग झाला.

दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी ही घटना घडली. एपीके फाईल डाऊनलोड होताच त्यांचा मोबाईल हँग झाला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला मोबाईल सुरू केला. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 3 लाख 457 रुपये हडप केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Advertisement
Tags :

.