कोकणातील युवकांचा दुबई -शारजाहमध्ये गणेशोत्सव
तब्बल बारा वर्षे करताहेत जपतायेत परंपरा
नीलेश परब / न्हावेली
कोकणातील गणेशोत्सव हा महत्त्वाचा आणि उत्साहाने साजरा होणारा सण या गणेश चतुर्थी सणाच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात होते यात प्रामुख्याने घरची साफसफाई रंगरंगोटी सजावट गणेशमूर्ती शाळेत जाऊन मूर्तीची निवड करणे आरती भजन यांची तयारी करण्यात येते.तर सार्वजनिक ठिकाणी मंडप हालते देखावे संदेश देणारे हे देखावे करण्यात युवा पिढी व्यस्त असते.त्याचप्रमाणे व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहणारे कोकणी लोक गणेशोत्सवासाठी गावी परतात.गणेशोत्सव कोकणातील सामाजिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा सण मानला जातो.या सणामुळे लोक एकत्र येतात.नातेसंबंध दृढ होतात.सामाजिक एकोप्याने लोक एकत्र राहतात.गणेशोत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि चालीरिती जपण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.आपल्या सिंधुदुर्गातील आणि गोव्यातील युवकांनी आपली रुढी परंपरा जपत गेली बारा वर्षे दुबई शारजाह येथे गणेश उत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत.प्रथमच जेव्हा दुबई येथे गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलं तेव्हा शेखर मांजरेकर,नारेश मांजरेकर,देवानंद वॅालवोईकर,अजित शेठगावकर,सुरेश परब,यांनी २०१२ पासून गणेशचतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली.पहिले दोन वर्षे फक्त गणेश पूजन करायचे त्यानंतर जेव्हा आपल्याकडच्या युवकांची संख्या वाढली तेव्हापासून मग मोठ्या जल्लोषात मंडप डेकोरेशन महाप्रसाद आरती भजन करण्यास सुरुवात झाली.वेगवेगळ्या परिसरात राहणारे सर्व युवक मित्रपरिवार यादिवशी मात्र एकत्र येऊन गणेशचतुर्थी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. तस पाहिलं तर गणेशोत्सव कोकणामध्ये धूमधडाक्यात साजरा केला जातो.मात्र कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना याचा आनंद घेता येत नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग गोव्यातील युवकांनी दुबई शारजाह येथे एकत्र येऊन गेली बारा वर्षे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात.सर्वच युवक याठिकाणी एकत्र येत गणेश मूर्ती सजावटीपासून मूर्तीपूजन नैवेद्य भजन फुगड्या आदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करतात आणि परदेशी राहून सुद्धा आपली रुढी परंपरा जपताना दिसतात.मात्र कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना दरवेळी गावी येता येत नाही अशावेळी परदेशी राहणारे सिंधुदुर्गातील गोव्यातील युवकांनी दुबई शारजाहमध्ये आपली रुढी परंपरा अबाधित राखण्यासाठी एकत्र येत गणेश चतुर्थी सण साजरा करतात.