कलंबिस्त येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या
03:07 PM Mar 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी -
Advertisement
सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील 26 वर्षीय निलेश न्हानु सावंत या युवकाने घराच्या अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.
Advertisement
Advertisement