For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्सुलीतील तरुणाचा आंबोलीत बुडून मृत्यू

इन्सुलीतील तरुणाचा आंबोलीत बुडून मृत्यू
Advertisement

आंबोली : आंबोलीतील सतीचिवाडी येथील चिरेखाणीत बुडून संजय लक्ष्मण गावंकर (वय ५०, रा. इन्सुली) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. संजय गावंकर हे माजगाव व इन्सुली येथील काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. सतीचिवाडी येथील चिरेखाणीतील खोल पाण्यात ते बुडाले.

Advertisement

या घटनेची माहिती माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली व सांगेली रेस्क्यू टीमला दिली. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत खोल पाण्यात शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या बचावकार्यात सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली व सांगेली रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी मदत केली. दरम्यान, आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.