For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांजा विक्री प्रकरणी हुंचेनट्टीच्या तरुणाला अटक

06:01 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गांजा विक्री प्रकरणी हुंचेनट्टीच्या तरुणाला अटक
Advertisement

सीसीबीची कारवाई, पावणे दोन किलो गांजा जप्त

Advertisement

► त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बेळगाव-जांबोटी रोडवरील मच्छेनजीक गांजा विकणाऱ्या हुंचेनट्टी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 1 किलो 704 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मच्छेजवळ एक तरुण गांजा विकण्यासाठी आल्याची माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून आकाश दिलीप दोडमणी (वय 26, रा. जयनगर हुंचेनट्टी) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 80 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

हा साठा आपण कंग्राळी बी. के. येथील कार्तिक याच्याकडून आणल्याची कबुली आकाशने दिली आहे. त्यामुळे आकाशबरोबरच कार्तिकवरही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्याजवळून गांजाबरोबरच दोन मोबाईल संचही पोलिसांनी जप्त केले आहेत. आकाश हा व्यवसायाने पेंटर आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

खून प्रकरणातही सहभाग

गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आलेला आकाश हा बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील हुंचेनट्टी येथे झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणात तो आरोपी होता. या प्रकरणानंतर तो फरारी होता. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला गांजा विक्री प्रकरणी अटक केल्यामुळे आता मजगावच्या तरुणाच्या खून प्रकरणीही त्याच्यावर कारवाई होणार आहे.

Advertisement
Tags :

.