For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटारसायकल अपघातात हिंदवाडी येथील तरुण ठार

11:38 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोटारसायकल अपघातात हिंदवाडी येथील तरुण ठार
Advertisement

बेळगाव : सोमवारी रात्री उशीरा हिंदवाडी येथील आयएमईआर जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एकजण जखमी झाला आहे. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निखिल शांतीनाथ पाटील (वय 37 रा. आदर्शनगर-हिंदवाडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मोटारसायकलवरून आपल्या घरी जाताना वडगावहून आलेल्या मोटारसायकलची धडक बसून ही घटना घडली. या अपघातात दुसऱ्या मोटारसायकलवरील भावेश जयराम वेर्णेकर (वय 20 रा. सोनार गल्ली-वडगाव) हा तरुणही जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदेवप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अपघातग्रस्त मोटरसायकली पोलीस स्थानकात हलविण्यात आल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.