कुडचडेत ट्रक-दुचाकी अपघातात काकोड्यातील तरुणाचा मृत्यू
02:43 PM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रवींद्र भवनसमोर घडली दुर्घटना : पोलिसांकडून तपास सुरू
Advertisement
कुडचडे : येथील रवींद्र भवनसमोर रविवारी पहाटे अंदाजे 5.30 च्या दरम्यान ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलिस स्थानकातून प्राप्त झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काऱ्यामड्डी, काकोडा येथील जेस्वल दिनीज (वय 18 वर्ष) हा आपल्या दुचाकीवरून जात असताना, समोरून येणाऱ्या ट्रकशी त्याची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचालक जेस्वलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक पेरिउदक, सावर्डे येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत खरात करत आहेत.
Advertisement
Advertisement