For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | रंगपंचमीला कळंबा तलावात तरुण बुडाला; शोधमोहीम सुरू

12:25 PM Mar 09, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   रंगपंचमीला कळंबा तलावात तरुण बुडाला  शोधमोहीम सुरू
Advertisement

                                              कळंबा तलावात तरुण बेपत्ता

Advertisement

कळंबा -रंगपंचमीच्या दिवशी कळंबा तलावात आंघोळीसाठी गेलेल्या परप्रांतीय तरुणाचा पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. राजदीप नारायण सहा (वय ३०, सध्या रा. निकम गल्ली, कळंबा; मूळ गाव पटणा, बिहार) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजदीप सहा हे गेल्या काही वर्षापासून कळंबा येथे कुटुंबासह राहत असून ते सेंट्रींगचे काम करत होते. रविवार. ८ रोजी दिवसभर मित्रांसह रंगपंचमी खेळल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ते भाऊ उदयकुमार व काही मित्रांसह कळंबा तलावावर आंघोळीसाठी गेले होते. तलावाच्या सांडव्या नजिक असण्प्रयाकाठावरून सर्वजण पाण्यात उतरले.

यावेळी राजदीप यांनी तलावाच्यापश्चिम बाजूच्या पात्रात सूर मारला. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा राजदीप सहा अंदाज न आल्याने तसेच दम लागल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त घटना लक्षात होत आहे. ही येताच त्यांच्या भाऊ व मित्रांनी आरडाओरडा करत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावातील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे राजदीप यांचा काहीच मागमूस लागला नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने तलाव परिसरात गर्दी केली होती.दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तलावात हुकच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी पाच ते साडेसात वाजेपर्यंत तलावात शोधकार्य सुरू होते.

Advertisement

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत राजदीप यांचा शोध सुरू होता या घटनेमुळे कळंबा परिसरात खळबळ उडाली आहे. संडब्या नजिक फिरावयास येण्णनया नागरिकांनी युवकांची आरडाओरड पाहून घटनास्थळी धाव घेत करवीर पोलिसाना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी याबाबत आपत्ती व्यवस्थापनास कळवले. संयुक्त शोध मोहीम रात्री उशीरापर्यंत राबवण्यात आली पण राजदीपला शोधण्यात अपयश आल्याने मोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे, याबाबत करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दाखल करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.