मासे पकडायला गेला अन् घात झाला !
इन्सुली पागावाडीत ढोलीत डोके अडकल्याने तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली पागावाडी येथील वाघाचे ढोल येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके ढोलीत अडकल्याने मृत्यू झाला. हेपोलीन इनास परेरा ( वय. 45, रा. इन्सुली पागावाडी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सायमन आलेक्स फर्नांडिस ( वय. 58, पागावाडी) यांनी याबाबत ची खबर बांदा पोलिसात दिली. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेपोलीन इनास परेरा हा तरुण इन्सुली पागावाडी येथे आपल्या कुटुंबीयसह राहतो. त्याला मासे पकडण्यासाठी जाण्याची सवय होती. मंगळवारी तो घरी दिसला होता. त्याला मासे पकडण्यासाठी जाण्याची सवय होती. तो पागावाडी येथील वाघाची ढोल येथे मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचे डोके त्या ढोलीत अडकले. डोके ढोलीत अडकून राहिल्याने तो मयत झाला असा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तविला.सोमवारी रात्री तो घरी न परतल्याने स्थानिकांनी मंगळवारी सकाळी त्याची शोधा शोध चालू केली. सदरचा परिसर जंगलमय परिसर असल्याने स्थानिकांनी वाघाच्या ढोलीत पाहणी केली असता त्या ढोलीत तो अडकल्याचे आढळून आले. पाहणी केली असता तो मयत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती पोलिसांना देताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात भाऊ, बहीण असा परिवार आहे.