For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : शिराळ्यात दुचाकींच्या भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

01:59 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
sangli   शिराळ्यात दुचाकींच्या भीषण अपघातात युवकाचा मृत्यू
Advertisement

                              पाडळी रोडवर दोन मोटारसायकलींची धडक;

शिराळा
: शिराळा येथील पाडळी रोडवर दोन मोटारसायकलींच्या अपघातामध्ये सुधिर जालिंदर कांबळे (वय ३६) रा. बाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) या युवकाचा मृत्यू झाला असून दोन्ही मोटरसायकलींचे नुकसान झाले आहे. सदर घटना बुधवार दिनांक ७ रोजी रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत उदय दिनकर बाकुर्डेकर रा. बाकुर्डे (ता. शिराळा) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिराळा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मयत सुधीर कांबळे हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. तो कामावरून मोटरसायकल क्रमांक एम एच १४ यु ७८१६ वरून घरी बाकुर्डे खुर्द ते शिराळा असे जात असताना रसिका मंगल कार्यालय शिराळा येथे आला असताना समोरून मयुर प्रकाश बामणे रा. मांगले (ता शिराळा) याने मोटरसायकल क्रमांक एम एच १० इ पी ४५७६ बरुन भरधाव वेगाने येत मयत सुधिर कांबळे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पाडळी (ता.शिराळा) येथील अजय जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते रणजित बाकुर्डेकर यांना फोनवरून अपघाताची कल्पना दिली. यावेळी रणजित वाकुर्डेकर आणि त्यांचे बंधू उदय बाकुर्डेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बंटी नांगरे यांनी रुग्णवाहिकेतून सुधीर यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत
घोषित केले.

सुधीर यांच्या निधनाची बातमी समजताच बाकुर्डे खुर्दसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कष्टाळू आणि मनमिळाऊ तरुण म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर बाकुर्डे खुर्द येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास शिराळा पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.