For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकीची पिकअपला धडक ; युवक जागीच ठार

06:45 PM Sep 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दुचाकीची पिकअपला धडक   युवक जागीच ठार
Advertisement

दोडामार्ग विजघर राज्यमार्गावर तिलारी शेटवेवाडी येथील घटना

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

दोडामार्ग विजघर राज्य मार्गावरील तिलारी शेटवेवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मालवाहतूक पिकअपला जोरदार धडक दिल्याने राहुल दिलीप वरक (१९ राह.कुंब्रल)या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला विठ्ठल देऊ घारे (२० राह. कुंब्रल)हा जखमी झाला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कुंब्रल धनगरवाडी येथील राहुल दिलीप वरक व त्याचे साथीदार रविवारी दुपारी तिलारीत पर्यटन करून माघारी परतताना सायं ४ च्या सुमारास राहुल दिलीप वरक याच्या दुचाकीची तिलारी चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक पिकअपला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात राहुल याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र सुदैवाने बचावला आहे. त्यालाही डोक्याला मार बसला आहे. तात्काळ 108 रुग्णवाहिका मागवून उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकी मुख्य रस्त्यावरच असल्याने विजघर दोडामार्ग राज्यामार्गवरील वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती घटनास्थळी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे ,पोलीस श्री देसाई व सहकारी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याचे कळताच भीतीने पिकअप चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं. या अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी तिलारीकडे धाव घेतली. यावेळी कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे, अनिल गवस आदीनी घटनास्थळी येत मदतकार्य केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.