Atpadi accident | आटपाडीत अतिक्रमणामुळे तरुणाचा बळी; अपघातानंतर नागरिकांचा संताप
आटपाडी अपघाताला अतिक्रमण कारणीभूत
आटपाडी: आटपाडी शहरातरविवारी दुपारी झालेल्या दुचाकी आणि चारचाकी अपघाताला ब्राम्हणघाट-बायपास रस्त्यावरील अतिक्रमणदेखील कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिक्रमण केलेल्या खोक्यांमुळे रस्त्यावरील वाहनांची ये-जा लक्षात येत नाही. त्यामुळेच पार्थ दादासाहेब डोईफोडे या तरूणाचा बळी गेला असुन या अपघातामुळे शहरातील अतिक्रमणे ऐरणीवर आली आहेत. नगरपंचायतने ही अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
आटपाडी शहरात साईमंदिर ते एसटी स्टॅण्ड, तेथुन सांगोला चौक, नगरपंचायत, बाजार पटांगण, शुक ओढ्यावरील पुल, तेथुन अण्णाभाऊ साठे चौक, पोलीस ठाणे, पंचायत समिती आणि आबानगर चौक हा संपूर्ण मार्ग अतिक्रमणांमध्ये हरविला आहे. शिवाय बाजार पटांगण ते एसटी स्टॅण्डकडे जाणारा बायपास रस्तादेखील अतिक्रमणांच्या विळख्यात आहे.
या अतिक्रमणांबाबत नगरपंचायत, बांधकाम विभागाने गांधारीची भुमिका घेतली आहे. अतिक्रमण असलेल्यांचे पुनर्वसनकरण्यासह त्यांना पर्यायी जागेची उपलब्ध करून देण्यासाठी व्यापकगरज आहे. उपाययोजनांची शिवाय रस्त्यांच्या कामासाठीही या अतिक्रमणांचा असणारा अडथळा दुर करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
रविवार झालेल्या ब्राम्हणघाट-बायपास रस्त्यावरील कार आणि दुचाकी अपघातालाही हीच अतिक्रमणे कारणीभुत ठरली आहेत. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमणे आहेत. त्यामुळे या मार्गावरून येणारे बाहन मुख्य बायपास रस्त्यावरील वाहनधारकांना दिसत नाही. त्यामुळे अपघात घडतात. आणि तशीच घटना रविवारी घडली आणि चारचाकी-दुचाकी अपघातात पार्थ डोईफोडे या तरूणाचा बळी गेला. एकाचा बळी आणि एक गंभीर जखमी होण्याच्या या घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतानाच या अपघातांना अतिक्रमणेदखील तितकीच कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवण्याबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज असलचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.