महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव बोलेरोच्या ठोकरीने युवकाचा जागीच मृत्यू

12:54 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॉर्निंग वॉकसाठी जाताना अपघात

Advertisement

बेळगाव : मॉर्निंग वॉकसाठी जाताना एका युवकाचा भरधाव गुड्स बोलेरोच्या ठोकरीने मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी महात्मा फुले रोडवर ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. श्रीधर दिलीप पवार (वय 43) रा. संतसेना रोड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सोमवार दि. 23 सप्टेंबर रोजी रक्षाविसर्जन होणार आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्रीधर गुरुवारी सकाळी  मॉर्निंग वॉकसाठी आपल्या घरातून बाहेर पडले होते. महात्मा फुले रोडवर रस्ता ओलांडताना भरधाव गुड्स बोलेरोची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बोलेरोचालक पारसराम सावळाराम (वय 25) रा. कलमठ रोड हाही जखमी झाला आहे. वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article