For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमएसडीएफ संघाकडे युवा युथ चषक

08:45 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमएसडीएफ संघाकडे युवा युथ चषक
Advertisement

अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पराभव: आराध्य नाकाडीचे सर्वाधिक गोल

Advertisement

बेळगाव : चिपळूण महाराष्ट्र  येथील एस.व्ही.जे.सी.टी.यांच्यावतीने युथ गेम्स फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात एस त्री फुटबॉल अकादमी कोल्हापूर संघाचा 3-0 असा पराभव  करून युथ चषक पटकाविला. चिपळूण येथील डेरवण येथे संस्थेच्या स्टेडियमवर घेण्यात आलेल्या  स्पर्धेत एम. एस. डी. एफ. फुटबॉल संघाने पहिल्या सामन्यात कोल्हापूर फुटबॉल अकॅडमी संघाचा 5-0 असा पराभव केला. एम.एस.डी.एफ.फुटबॉल संघातर्फे आराध्य नाकाडीने 2, अब्दुल हकीम जान मुल्ला व योगेश यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. उपांत्य पूर्व सामन्यात एमएसडीएफ फुटबॉल संघाने गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघाचा 2-0 असा पराभव केला. यावेळी आराध्य नाकाडी व संतोष यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. उपांत्य फेरीतच्या सामन्यात एमएसडीएफ फुटबॉल संघाने झील फुटबॉल अकॅडमी सांगली संघाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात आराध्य नाकाडी 2 तर माहिद भडकलीने 1 गोल केला. अंतिम निर्णायक सामन्यात एमएसडीएफ फुटबॉल संघाने एस त्री कोल्हापूर फुटबॉल अकॅडमी संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या सामन्यात टोपर, माहीद व जोगेश यांनी प्रत्येकी 1 गोल केले. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगावच्या एमएसडीएफ फुटबॉल संघाला व उपविजेत्या एस त्री कोल्हापूर फुटबॉल अकॅडमी कोल्हापूर संघाला आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण सामन्यात आराध्य नाकाडी याने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवत सर्वाधिक गोल नोंदविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.