कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेर्सेबांबर्डेच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

04:27 PM Mar 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

झाराप रेल्वेस्थानक नजीकची घटना

Advertisement

कुडाळ -

Advertisement

तेर्सेबांबर्डे - परबवाडी येथील दत्तप्रसाद नीलेश परब ( 25) याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्याच्या मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नव्हता. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते.अलीकडे तो या आजाराने त्रस्त होता. त्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची खबर त्याचे काका मंगेश लक्ष्मण परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दत्तप्रसाद काल रात्री घरी झोपला. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास तो तेथे नसल्याचे लक्षात आले. त्यांनंतर त्याची शोधाशोध करण्यात आली . मात्र , झाराप रेल्वेस्थानक नजीक तेर्सेबांबर्डे हद्दीत रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला. त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे 3.30 ते सकाळी.6 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.या घटनेने तेर्सेबांबर्डे दशक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sucide # zarap #
Next Article