For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : खोट्या मोबाईल चोरीच्या आरोपातून तरुणाची आत्महत्या; सुपरवायझरवर गुन्हा दाखल

01:12 PM Nov 25, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   खोट्या मोबाईल चोरीच्या आरोपातून तरुणाची आत्महत्या  सुपरवायझरवर गुन्हा दाखल
Advertisement

                                   सुपरवायझरच्या अपमानामुळे २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Advertisement

सांगरुळ : सांगरुळ करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील तरुणावर सुपरवायझरने मोबाईल चोरीचा खोटा आरोप करून त्याचा अपमान केल्याने मानसिक तणावाखाली त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. रोहित उर्फ कुमार आनंदा कांबळे (वय २४ रा. सांगरुळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सुपरवायझर विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार कांबळे मेनन अॅण्ड मेनन कंपनीमध्ये ऑप्टिगाना कंपनीमार्फत कॉन्ट्रॅक्टवर काम करत होता. गुरुवारी दुपारी कामाच्या ठिकाणी सुपरवायझर विकास शंकर डोंगळे (वय ४०, रा. घोटवडे ता. राधानगरी) यांनी कुमारवर मोबाईल चोरीचा खोटा आरोप लावून, कामावर येऊ नकोस म्हणत त्याला कामावरून दूर केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.

Advertisement

या घटनेमुळे तणावग्रस्त झालेल्या कुमार कांबळे यांनी त्याच दिवशी आपल्या शेतात किटकनाशके एकत्र करून प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्याला सीपीआर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. २४ रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताच्या बहिणीच्या नवऱ्याने, अक्षय भगवान कांबळे (रा. गर्जन, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement
Tags :

.