For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; सोलापुरात तरुणाविरुद्ध गुन्हा

03:56 PM Aug 26, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग  सोलापुरात तरुणाविरुद्ध गुन्हा
Advertisement

सोलापूर - कॉलेजच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन समीर नैनशा मकानदार (रा. सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या तीन महिन्यापासून समीर हा यातील पीडित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत आहे.

Advertisement

ती कॉलेजला जाताना व कॉलेजमधून येताना तिचा सतत पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तसेच ३ जुलै रोजी पीडिता ही कॉलेजसमोरील बोळातून घराकडे जात असताना मागून येऊन समीर याने तिचा हात पकडून मला तू आवडतेस, मला तुझा मोबाईल नंबर दे,

मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच २१ ऑ गरट रोजी देखील पीडिता ही कॉलेज संपवून घराकडे जात असताना समीरने तिचा पाठलाग केला. पोलीस उपनिरीक्षक ढगे तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.