For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रेश रक्ताअभावी थांबलेल्या ओपन हार्ट शस्त्रक्रीया पूर्ण

05:04 PM Mar 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
फ्रेश रक्ताअभावी थांबलेल्या ओपन हार्ट शस्त्रक्रीया पूर्ण
Advertisement

युवा रक्तदाता संघटना ठरली हक्काची 'ब्लड बँक'

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालयात दोघांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी तात्काळ ६ फ्रेश रक्ताच्या बॅग ची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी रक्तदान करीत या दोघा रुग्णांचे प्राण वाचवले. त्यामुळे रूग्णांसाठी हक्काची 'ब्लड बँक' ठरलेल्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यामुळे रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेसह सर्व रक्तदात्यांचे या दोन्ही रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.गोवा बांबोळी रुग्णालयात ओपन हार्ट शस्त्रक्रीयेसाठी एका रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ४ फ्रेश ब्लड बॅग ची गरज होती. तर दुसऱ्या रुग्णाला ए बी पॉझिटिव्ह गटाच्या दोन ब्लड बॅगची तात्काळ गरज होती. मात्र एकाच वेळी सहा फ्रेश रक्तपिशव्या उपलब्ध करणे कठीण असल्यामुळे या दोन्ही रूग्णांच्या नातेवाईकांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देव्या सुर्याजी यांनी आपल्या संघटनेच्या रक्तदात्यांना संपर्क करीत नियोजन केले.त्यानुसार युवा रक्तदाता संघटनेचे रक्तदाते मयूर गावडे, प्रथमेश सुकी, तौसिफ शेख, शुभम धारगळकर, ओंकार सावंत, रॉकसन डॉटस या सहा युवकांनी सावंतवाडीतून तात्काळ गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले. या सर्वांनी वेळीच रक्तदान केल्यामुळेच दोन्ही रुग्णांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियां पूर्ण झाल्या. त्यामुळे तात्काळ रक्तपुरवठा केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. दरम्यान अनेक ठिकाणी संघटनेचे सदस्य आणि रक्तदाते सामाजिक भान ठेवून अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनून रक्तदान करत आहेत‌. गेली अनेक वर्ष युवा रक्तदाता संघटना रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालय ओरोस व गोवा मणीपाल रूग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या मदतीला युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी धावून जात रूग्णांना जीवनदान दिले आहे. गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून दिले जात आहे. यापुढेही रक्तदानासाठी संघटना अशाच पद्धतीने कार्यरत राहील. या रक्तदान चळवळीत अनेकांनी सामील होऊन रक्तदान करावे आणि रूग्णांचे जीव वाचवावेत असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.