Sangli Crime : सांगलीत पार्किंगचे पैसे मागत तरुणावर चाकूने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
टिंबर एरिया परिसरातील तरुणावर मारहाण
सांगली : पार्किंगचे पैसे मागण्याच्या उद्देशाने चारचाकीतील एकावर चाकू सारख्या हत्याराने हल्ला करुन लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमी संकेत संभाजी पाटील (वय २७, रा. मराठासंघ नजीक, मंगसुळी, ता. कागवाड) याने विश्रामाबग पोली-सात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोर हर्ष बाघमारे याच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवार ७ रोजी रात्री फिर्यादी संकेत पाटील चारचाकीतून टिंबर एरिया परिसरातून निघाला होता. त्याने नवीन वसाहत येथील स्व-स्तिक काट्यानजीक लघुशंकेकरिता चारचाकी थांबविली. याचवेळी संशयित हर्ष वाघमारे आणि त्याचे दोन सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी पार्किंगच्या नावाखाली त्याच्याकडे पैसे मागितले. यावरुन झालेल्या वादातून हर्ष वाघमारेने कमरेला लावलेल्या चाकूसारख्या हत्याराने फिर्यादी संकेत पाटील याच्या उजव्या बाजूस बार केला.