For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावात तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला?

08:01 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावात तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला
Advertisement

बोलावून घेऊन काटा काढल्याची चर्चा : हल्लेखोरही फरार असल्याने संशय बळावला

Advertisement

 त. भा.  प्रतिनिधी

बेळगाव : ऐन गणेशोत्सवात गुन्हेगारीचे प्रकार वाढू लागले आहेत. रविवारी रात्री मंडोळी रोडवर एका तरुणाला बोलावून तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला कारच्या डिक्कीत कोंबून टोळक्याने तेथून पलायन केले आहे. रविवारी रात्रीपासूनच बेळगाव पोलीस या घटनेचा माग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Advertisement

मंडोळी रोड, भवानीनगर, वाटवे कॉलनी परिसरात रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत ही घटना घडली आहे. याच परिसरात जुगारी अ•ा चालविणाऱ्या एका युवकाने हे कृत्य केले असून रविवारी रात्रीपासून तो फरारी आहे. पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी मल्लनगौडा नायकर आदी अधिकारी वाटवे कॉलनी परिसरात दाखल झाले होते.

सांबरा रोड परिसरातील एक तरुण रविवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. त्याचा मोबाईलही स्वीच-ऑफ झाला आहे. या तरुणावरच टोळक्याने हल्ला केला आहे. मंडोळी रोडवर बोलावून घेऊन त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची माहिती उपलब्ध झाली असून जखमी तरुण कोठे आहे? याचा सोमवारी रात्रीपर्यंत उलगडा झाला नाही.

उपलब्ध माहितीनुसार सोमवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकात तो तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद  दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे सांगत ठोस माहिती देण्यास नकार दिला. ज्याने हल्ला केल्याचा संशय आहे, त्याचा रविवारी रात्रीपासूनच माग काढण्यात येत आहे. त्याचाही थांगपत्ता लागला नाही.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. एका कारपाठोपाठ मोटारसायकल जातानाचे फुटेज उपलब्ध झाले आहे. मंडोळी रोडवरून निघालेली कार कोठे गेली? जखमीची अवस्था काय आहे? यासंबंधी कसलीच माहिती मिळाली नाही. एका हल्लेखोराचे नाव पोलीस यंत्रणेला समजले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तरुणाला बोलावून घेण्यासाठी तरुणीचा वापर

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू आहे. काही अधिकाऱ्यांच्या आशीवार्दाने जुगारी अ•s उदंड झाले आहेत. रविवारी रात्री तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करणाराही याच परिसरात जुगारी अ•ा चालवतो, अशी माहिती मिळाली आहे. रविवारी ज्याने हल्ला केला आहे, त्याच्यावरही यापूर्वी चाकू हल्ला झाला होता. सध्या मंडोळी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात तो अ•ा चालवत होता. एका तरुणीचा वापर करून मंडोळी रोडपर्यंत त्या तरुणाला बोलावून घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्लेखोरांना अटक झाल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.