For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : इचलकरंजीत युवकावर हल्ला, एकावर गुन्हा

06:12 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   इचलकरंजीत युवकावर हल्ला  एकावर गुन्हा
Advertisement

                                      एएससी कॉलेजजवळील बडापाव सेंटरवर हिंसाचार;

Advertisement

इचलकरंजी : जोशी परिसर  येथील एएससी कॉलेजजवळील पेट्रोल पंप शेजारी असलेल्या एका बडापाव सेंटरवर काम करणाऱ्या तरुणाव एकाने पाठीमागून येत लाकडाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या मनोज विलास बडवे (वय ३५, रा. विवेकानंद कॉ लनी) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी महेश कृष्णात काजवे (रा. डॉ. विलास
शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मनोज बडवे हे एएससी कॉलेजसमोर एवन बडा सेंटरवर काम करीत होते. याच वेळी संशयित महेश काजवे हा अचानक पाठीमागून आला. तू माझ्या बायकोचा सांभाळ करतोस आणि माझा करत नाहीस, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत संशयिताने हातातील लाकडाने बडवे यांच्या डोक्यावर पाच वेळा वार केले.

Advertisement

यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाली असून डाव्या हातालाही खोल जखम झाली आहे.या हल्ल्यानंतर संशयित महेश हा शिवीगाळ व दमदाटी करत घटनास्थळावरून पळून गेला. जखमी बडवे यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, संशयिताचा शोध सुरू असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Advertisement
Tags :

.