सांगलीत युवकावर कोयत्याने हल्ला
सांगली :
किरकोळ कारणावरुन युवकावर कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार दि. आठ रोजी सकाळी दहा च्या सुमारास मिरज तालुक्यातील नांद्रे येथे घडला.
यामध्ये प्रणव तानाजी कदम (वय 22, रा. नांद्रे नायरा पेट्रोल पंपाच्या मागे, ता. मिरज, जि. सांगली) हा जखमी झाला. पोलिसांनी संशयित प्रतिक सुनील चौगुले (रा. नांद्रे ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी प्रणव कदम यास त्याचा मित्र संशयित प्रति क चौगुले याचा दि. सात रोजी फोन आला होता. त्यावेळी प्रतिक याने प्रणव यास, तुझ्या मोबाईलच्या डिसप्लेसाठी दिलेले 2 हजार 500 रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर दि. 8 रोजी सकाळी 10 च्या सुमारास प्रणव हा आश्रम शाळेच्या बाथऊमच्या पायरीवर बसला होता. त्यावेळी दुचाकीवऊन प्रतिक हा तेथे आला आणि जवळ असलेल्या कोयत्याने अचानक डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच अंगठ्यानजीक वार केले. तसेच प्रणव यास शिवीगाळ कऊन तो तेथून पसार झाल्याचे तक्रारीत आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.