For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | ‘तक्रार का करता?’ म्हणत तरुणावर हल्ला; फायटर-वीटने मारहाण, रोकड लंपास

12:31 PM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   ‘तक्रार का करता ’ म्हणत तरुणावर हल्ला  फायटर वीटने मारहाण  रोकड लंपास
Advertisement

सोलापूर -गल्लीत नवी पेठेतील मोबाईल दारूधंद्याविरुध्द पोलीसांकडे तक्रार देण्याच्या कारणावरून तरूणावर हल्ला करून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

याबाबत शुभम श्रीकांत धुळराव (वय ३०, रा. महात्मा गांधी रोड, चांभार गल्ली, उत्तर कसबा, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन संतोष लक्ष्मण धोत्रे, आकाश संतोष धोत्रे, रोहित सूर्यकांत धोत्रे (सर्व रा. चांभार गल्ली, उत्तर कसबा, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम धुळराव व संतोष धोत्रे हे दोघेएकाच गल्लीत राहतात. २९ ऑगस्ट रोजी दुपारी शुभम व त्याचा भाऊ श्रीशैल हे दोघे नवी पेठेतील मोबाईल गल्लीतील आराध्या मोबाईल शॉपी या दुकानात बसले होते. त्यावेळी संतोष धोत्रे, आकाश धोत्रे, रोहित धोत्रे हे तिघे आले. संतोष याने शुभम यास जातीवाचक शिवीगाळ करून तुझ्या घरच्यांना नीट समाजवून सांग, तु आणि तुझ्या घरातले सगळेजण माझ्या दारूधंद्याविरुध्द पोलीसांकडे तक्रार देता का, थांब तुला माझा हिसका दाखवतो असे म्हणत असताना आकाश याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून फायटर काढून शुभम व श्रीशैल या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच रोहित याने रस्त्यावर पडलेली वीट घेऊन श्रीशैल यास फेकून मारली. ती त्याच्या डोळ्यावर लागून तो जखमी झाला. त्यावेळी संतोष याने शुभमच्या शर्टाचा खिसा फाडून त्यातील रोख १३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सहायक पोलीस आयुक्त अरूण देवकर तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.