For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ल्यात गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात

02:17 PM Jul 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ल्यात गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात
Advertisement

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची धडक कारवाई: ११ हजार किमतीचा गांजा जप्त

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
उभादांडा-बागायतवाडी येथे गांजा सदृश्य माल विक्रीच्या उद्देशाने घेऊन वावरणाऱ्या प्रसाद प्रकाश तुळसकर (३२) यास वेंगुर्ले पोलिसांनी रंगेहात पकडले. संशयावरून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ गांजा सदृश्य अंमलीपदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेंगुर्लेतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने नूतन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची भेट घेऊन अमली पदार्थावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वेंगुर्ले पोलिसांनी वेंगुर्ले शहर व किनारपट्टी भागातील संशयित जागांवर लक्ष केंद्रीत केले होते. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी तातकळ आपली यंत्रणा सक्रीय करत उभादांडा, बागायतवाडी येथील प्रसाद प्रकाश तुळसकर याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळ प्लास्टिक पिशवीत हिरवट रंगाचा गांजासदृश्य ३६६ ग्रॅम वजनाचा सुमारे ११ हजार किमतीचा माल त्याच्याकडे सापडला.या प्रकरणी वेंगुर्लेत पोलिसांत आरोपी प्रसाद प्रकाश तुळसकर यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम 8 (c), 20 (B) (ii) (a) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मुद्देमालासह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी) विनोद कांबळे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोजा, योगेश राऊळ, पोलीस नाईक स्वप्नील तांबे, पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस गौरी ताम्हणेकर, होमगार्ड तेजस्वी धुरी या पथकाने करण्यात आलेली आहे.निसर्ग ओतारी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा भार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी वेंगुर्लेवासीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने प भेट घेतली होती. त्यावेळी कुठेही अमली पदार्थ व्यवहार होत असल्यास कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड व पोलीस कर्मचारी हे वेंगुर्ले पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.