युवा ऑल स्टार्स चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था / हरीद्वार
येथील वंदना कटारिया इनडोअर स्टेडियमध्ये गुरुवार 6 मार्चपासून युवा ऑल स्टार्स चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा पहिल्यांदाच इकोपद्धतीनुसार खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये युवा मुम्बा, युवा पलटण, युवा योद्धास, वॉरियर्स के.सी., जयपूर पिंक क्लब, ज्युनियर्स स्टिलर्स हे सहा संघ सहभागी होत आहेत. व्यावसायिक कब•ाr क्षेत्रातील सहा संघ तसेच हौशी गटातील सहा गट असे एकूण 12 संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. हे संघ अ आणि ब गटात विभागले जाणार आहेत. प्रत्येक दिवशी चार सामने खेळविले जातील. 4 एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना होईल. या स्पर्धेत एकूण बक्षीसाची रक्कम 1 कोटी, 32 लाख 59 हजार रुपये असून विजेत्याला 15 लाख रुपये तर उपविजेत्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 65 हजार रुपये दिले जातील तर पराभूत संघाला प्रत्येक सामन्यानंतर 30 हजार रुपये मिळतील