For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश, अमृता फडणवीस यांचं ट्विट कोणाला झोंबणार?

01:19 PM May 02, 2022 IST | Abhijeet Khandekar
बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश  अमृता फडणवीस यांचं ट्विट कोणाला झोंबणार

मुंबई : 'मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं की अब्जाधीश फक्त आपणच आहात, मात्र आता कळलं की आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी कुटुंबात जोपासा,' असं ट्वीट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. याचं हे ट्विट मुख्यमंत्री उद्धव यांच्या टीकेचे उत्तर आह. अशी चर्चा रंगू लागली आहे.

Advertisement

'राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव चांगलं गातात, असं मला नुकतंच आदित्यने सांगितलं. माझ्यासाठी हा धक्का होता. कारण मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते,' असं उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथे एका कार्यक्रमात म्हटलं होतं. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे

दरम्यान, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वार सुरु आहे. याचा प्रत्यय देखील काही दिवसापूर्वी आला होता. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पण्णी केल्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर संबंधित ट्वीट डिलिट करण्याची नामुष्कीदेखील ओढावली होती. या वादानंतर आता पुन्हा एकदा अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून काय उत्तर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.