For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या विकासासाठी तुमची साथ मोलाची

10:41 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या विकासासाठी तुमची साथ मोलाची
Advertisement

बेळगाव लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांची विनंती

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास हा भाजपच्या कार्यकाळातच सर्वाधिक झाला आहे. बेळगावमध्ये केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प आणण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, अशी विनंती भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. केंद्रात तसेच राज्यात भाजप सत्तेत असताना अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या. मुख्यमंत्री, सभापती, पालकमंत्री तसेच विरोधी पक्षनेता असताना बेळगावला निधी मंजूर करण्यामध्ये आपला महत्त्वाचा वाटा होता. कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघाला नवा चेहरा मिळाला. त्यांच्या मंत्रिपदामुळे बेळगावला अनेक रेल्वेसेवा उपलब्ध झाल्या. भाजप पक्ष तत्त्व आणि सिद्धांतांवर चालणारा पक्ष असून कोणत्याही भुलथापांना बळी न पडता देशाच्या संरक्षणासाठी, संस्प़ृती व विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.