आपली कार माझ्या आईच्या घराएवढी !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा एक स्वारस्यपूर्ण किस्सा भारतातील अमेरिकेचे राजदूत विनय क्वात्रा यांनी एका सोशल मिडिया कंपनीकडे उघड केला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांची भेट झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांची कार प्रथम पहिली. तिचा आकार पाहून ते आचंबित झाले. ‘आपली कार तर माझ्या आईच्या घराएवढी मोठी आहे’ अशी टिप्पणी त्यांनी ओबामा यांच्याकडे केली. त्यावेळी ओबामा यांच्याकडे लिमो कार होती. याच कारमधून दोन्ही नेते नंतर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या स्मृतीस्थळाकडे गेले होते. हा 10 ते 12 मिनिटांचा मार्ग होता. तेव्हा ओबामांशी गप्पा मारताना त्यांनी ही टिप्पणी केली होती. प्रथम ओबामांनी त्यांच्याकडे त्यांच्या आईची चौकशी केली होती. आईची माहिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही टिप्पणी केली. ती ऐकून ओबामा चांगलेच आश्चर्यचकित झाले होते, असे क्वात्रा यांनी नोंद केले आहे.