For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनभर पेट्रोल पिणारी युवती

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनभर पेट्रोल पिणारी युवती
Advertisement

सकाळपासून रात्रीपर्यंत पिते पेट्रोल

Advertisement

जगात विचित्र सवयींचे प्रमाण कमी नाही, परंतु टीएलसी चॅनेलचा लोकप्रिय शो ‘माय स्ट्रेंज अॅडिक्शन’ने पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क केले आहे. या शोमध्ये दाखविण्यात आलेली 20 वर्षीय शॅननची कहाणी कळल्यावर तुम्ही दंग व्हाल. अमेरिका-इराण युद्धामुळे जगात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. अशास्थितीत सामान्य लोक पेट्रोल पंपांवर अनेक तास रांगेत राहून स्वत:च्या वाहनात पेट्रोल भरत आहेत. तर शॅनन गॅलनभर पेट्रोल पित असते.

तिची ही घातक सवय केवळ तिच्या परिवाराला चिंतेत पाडत नसून डॉक्टरांनाही हैराण करत आहे. शॅनन कॅनडातील रहिवासी आहे. तिने सुमारे एक वर्षापूर्वी पेट्रोल प्राशन करण्यास सुरुवात केली होती. प्रारंभी ती पेट्रोलची बाटली किंवा जेरीकॅन उघडून केवळ त्याचा वास घेत होती. मग तिने बोटांवर लागलेले पेट्रोल चाटण्यास सुरवात केली. हळूहळू ही सवय वाढत गेली आणि आता ती दररोज पेट्रोल पित आहे.

Advertisement

पेट्रोलचा स्वाद आंबडगोड आणि जळजळ निर्माण करणारा असल्याचे शॅनन सांगते. पेट्रोल पिल्यावर तिला प्रथम अंगात उत्साह संचारल्यासारखे जाणवते. मग जळजळ सुरू होते. तरीही ती स्वत:ला पेट्रोल पिण्यापासून रोखू शकत नाही. मी जेव्हा उदास किंवा एकटी असते, तेव्हा पेट्रोल पिल्यावर मला दिलासा मिळतो. माझ्या नैराश्याचे हे औषध ठरले आहे असे ती सांगते.

शॅननच्या या विचित्र सवयीमुळे तिचे कुटुंबीय अत्यंत त्रस्त आहेत. शॅननची आई आणि अन्य सदस्य तिला रोखण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती लपून पेट्रोल पित असते. शोमध्ये तिच्या परिवाराच्या सदस्यांनी हस्तक्षेप केला आणि तिने वैद्यकीय मदत घ्यावी अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पिल्यामुळे तिची फुफ्फुसं, यकृत आणि मेंदूला स्थायी नुकसान होऊ शकते. यामुळे कॅन्सर, नर्व्ह डॅमेज, हृदयविकाराचा धक्का आणि मृत्यूही होऊ शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पेट्रोलमध्ये बेंजीन, टोल्यूइन आणि अन्य रसायने असतात, जी शरीरासाठी अत्यंत विषारी असतात. नियमित स्वरुपात पेट्रोल पिल्याने तोंडात अल्सर, दात खराब होणे, श्वसनाचा आजार आणि अवयव निकामी होण्याचा धोका आहे. तरीही मी एकही दिवस पेट्रोलशिवाय राहू शकत नसल्याचे शॅननचे सांगणे आहे.

पेट्रोलचा घोट

शॅनन सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पेट्रोलचा एक घोट घेते, दिवसभरात ती अनेकदा गॅसस्टेशनला जाते किंवा घरात ठेवलेल्या कॅनमधील पेट्रोल पिते. तिच्या तोंडातून नेहमी पेट्रोलचा वास येत असतो. तज्ञांनुसार हे एकप्रकारचे पिका डिसऑर्डर असू शकते, ज्यात लोक नॉन-फूड आयटम्स खाणे किंवा पिण्याची इच्छा जाणवत असतात. कधीकधी नैराश्य, एंक्झाइटी किंवा न्यूट्रियंटच्या कमतरतेमुळे अशाप्रकारच्या सवयी निर्माण होतात. परंतु पेट्रोलसारखा धोकादायक पदार्थ पिणे अत्यंत दुर्लभ आहे. शो प्रसारित झाल्यावर सोशल मीडियावर याची चर्चा जोरात सुरु आहे.

Advertisement
Tags :

.