For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोती तलावात आत्महत्या केलेली युवती कारिवडे येथील

मोती तलावात आत्महत्या केलेली युवती कारिवडे येथील
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी मोती तलावात कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी लिसा भिकाजी गोसावी ही शाळेतून सावंतवाडीत आली होती. तिच्यासोबत तिची चुलत बहीण कृपा गोसावी होती. वैभववाडी नाधवडे येथील रोहन गोसावी हा त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक मुंबईहून तिला भेटण्यासाठी आला होता. सावंतवाडी मोती तलाव जवळ दोघांचीही बाचाबाची झाली. त्यानंतर युवतीने मोती तलावात उडी दिली. आणि सोबत असलेली चुलत बहीण हिच्यासमोरच घटना घडल्याने तात्काळ तिने रोहन गोसावी हा तिथून रस्त्यावर गेला असता युवतीने उडी दिली हे सांगताच रोहनने तिला वाचवण्यासाठी मोती तलावात उडी घेतली. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. नेमकी शाळकरी युवतीने मोती तलावात उडी का घेतली या मागचा शोध पोलीस घेत आहेत. ती शाळेत हुशार विद्यार्थिनी होती, सावंतवाडी मध्ये येथे खाजगी क्लाससाठी ती येत होती. आज शनिवार सकाळी शाळा सुटल्यानंतर ती सावंतवाडीत आली आणि तिने मोती तलावात उडी दिली. यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement

.