For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार

04:57 PM Jan 24, 2025 IST | Pooja Marathe
पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार
Advertisement

दारुच्या नशेत 'ट्रूथ अॅँड डेअर' गेम चा परिणाम
पुणे
पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार घटल्याचे समोर आले आहे. एखाद्या ओटीटी प्ल्रॅटफॉर्मवरील कथानकांनाही मागे पडेल असा प्रकार घडला आहे. शहरात १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. दारुच्या नशेत ट्रुथ अॅंड डेअर गेम खेळताना हा प्रकार झाला. हा धक्कादायक प्रकार सुरु असताना पीडीत मुलीचा फोन सुरु राहीला. मुलीच्या प्रियकाराने हा सर्व प्रकार ऐकला आणि पीडितेच्या आई-वडिलांना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यांनी त्वरीत धावपळ केली आणि मुलीला शोधले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले.
पिंपरीमध्ये एका सोसायटीत १७ वर्षीय तरुणी नीट परीक्षेसाठी राहत होती. पाच वर्षांपूर्वी २२ वर्षीय तरुणीसोबत पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मंगळवारी (दि. २१) रोजी या तरुणीने पीडीत तरुणीला फोन केला. तिने सांगितले की, मला घरातून बाहेर काढले आहे, तर राहण्यासाठी जागा मिळेल का. पीडित मुलीने, त्या तरुणीला एका दिवसासाठी तिच्या रुमवर राहायला बोलावले.
मंगळवारी संबंधित २२ वर्षीय तरुणी पीडितेच्या रुमवर आली. दरम्यान तिला मित्राचा फोन आल्याने ती त्याच्यासोबत रावेत येथील फ्लॅटवर गेली. याठिकाणी संबंधित तरुणीचा मित्र आणि त्याचे साथीदार दारु पीत होते. रात्री ११ च्या दरम्यान पीडीत तरुणीने संबंधित मैत्रिणीला फोन केला. तु कुठे आहेस, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे, असे सांगितले. तेव्हा त्या संबंधित तरुणीने दारुचे अति सेवन केले असल्याने, तुला माझी काळजी असेल, तर तूच इकडे ये, असे पीडीत तरुणीला सांगितले. तरुणीचे इतर दोन अल्पवयीन मित्र संबंधित तरुणीला आणण्यासाठी गेले. कारमधून ते रावेल येथील फ्लॅटवर आले. तेथे गेल्यावर संबंधित तरुणीने पीडित तरुणीला दारु पिण्याचा आग्रह केला. यामुळे अल्पवयीन मुलगीही दारू प्यायली. अल्पवयीन मुलगी, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा मित्र आणि त्या मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले. यानंतर या सर्वांनी ट्रुथ अॅण्ड डेअर हा गेम खेळायचे ठरवले. या गेम मध्ये पीडीतेची मैत्रीण हरली.
गेम सुरू असताना पीडीतेच्या मैत्रीणीला उलटी झाली. म्हणून दोन मित्रांनी धरून तिला बाथरुममध्ये नेले. त्यावेळी पीडित मुलगी दुसऱ्या बाथरुम मध्ये गेली. तिच्यामागे दारुच्या नशेतील संबंधित मैत्रिणीचा मित्र आला. त्याने बाथरुमध्ये पीडीतेवर अत्याचार केला. त्यावेळी पीडीत मुलीच्या मोबाइल तिच्या प्रियकराला फोन लागला. दोघांमधील संभाषण त्याने फोनवर ऐकले.
पीडित मुलीच्या प्रियकराने लगेचच हा प्रकार तिच्या आई-वडिलांना फोन कळवला. पीडित तरुणीचे लोकशन घेतले. आणि पीडीत तरुणीला नेमके काय घडले हे विचारले असताना, तिने घडला प्रकार सांगितले. त्यानंतर पालकांनी पीडीत मुलीला घेऊन पिंपरी पोलिस ठाणे गाठले. तेथून रावेत पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद केला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी फरार आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement

.