कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोणंद नागपंचमी उत्सवात पाळण्यातून पडता-पडता युवती बचावली

01:07 PM Jul 31, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लोणंद :

Advertisement

लोणंद येथे नागपंचमीच्या उत्सवात रंगलेल्या भरगच्च मेळाव्यात एक थरारक प्रकार घडला. पाळण्यातून (आकाशी पाळणा) फिरत असताना एका युवतीचा तोल सुटला आणि ती पडता पडता थोडक्यात बचावली. ही घटना पाहणाऱ्यांचे हृदय क्षणभर थरारले ! सुदैवाने, युवतीने समयसूचकतेने पाळण्याच्या लोखंडी गजाला घट्ट पकडले होते आणि खाली उपस्थित लोकांनीही वेळीच आरडाओरड करत यंत्र चालकाचे लक्ष वेधले. काही क्षणात पाळणा थांबवण्यात आली आणि युवतीचा सुखरूप बचाव झाला. या प्रकारानंतर अनेक नागरिकांनी पाळण्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचे नियम आणि देखरेख असणे गरजेचे आहे, अन्यथा एखादा जीव गमवावा लागू शकतो, अशी प्रतिक्रिया उपस्थितांपैकी एका पालकांनी दिली.

Advertisement

नागपंचमी उत्सव आनंदात साजरा होत असतानाच या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र युवतीची सुखरूप सुटका हीच सर्वांसाठी मोठा दिलासा ठरली. दरम्यान, आकाश पाळणावाल्यांनी सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article