For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवतीने डोळ्यात काढून घेतला टॅटू

06:12 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवतीने डोळ्यात काढून घेतला टॅटू
Advertisement

दृष्टीक्षमतेवर पडला प्रभाव

Advertisement

टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड नवा नाही. टॅटू पूर्ण शरीरावर काढून घेण्याचा ट्रेंड सधय आहे. लोक शरीराच्या कुठल्याही हिस्स्याला टॅटूने झाकोळून टाकत आहेत. सध्या एक महिला चर्चेत असून तिने स्वत:च्या डोळ्यांमध्ये टॅटू काढून घेतला आहे. टॅटू काढल्याने दृष्टीबाधित होऊ शकते याची जाणीव असूनही तिने जोखीम पत्करली आणि आता तिचे डोळे माशांच्या डोळ्यांसारखे वाटतात.

28 वर्षीय महिला ऑरोरा एरेना स्वत:च्या डोळ्यांमुळे चर्चेत राहते. ऑरोराने डोळ्यांमध्ये टॅटू काढून घेतल्याने तिचे डोळे माशांप्रमाणे दिसू लागले आहेत. डोळ्यांमध्ये टॅटू काढून घेणे अत्यंत गुंतागुंतीचे असते. टॅटूयुक्त इंकला पाण्यात मिसळत विरघळविले जाते, मग डोळ्यांमध्ये त्याला इंजेक्ट करण्यात येते, याला परिपूर्णपणे करण्याची आवश्यकता असते, अन्यथा व्यक्ती अंध होऊ शकतो असे ऑरोराचे सांगणे आहे.

Advertisement

नैराश्य ठरले कारण

मी आता माशांप्रमाणे वाटत असले तरीही मला डोळ्यांमधील टॅटू अत्यंत पसंत आहेत, हे  असहनशील आणि जजमेंटल लोकांना माझ्यापासून दूर ठेवण्यास मदत करतात. टॅटू काढून घेण्यामागे एक मोठे कारण हेते. मी दीर्घकाळापासून नैराश्यात होते. त्यातू बाहेर पडण्यासाठी मी हे टॅटू काढून घेतले. याचमुळे मला आता कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. मी टॅटू काढून घेतल्यावर स्वत:ला आरशात पाहिले आणि मी अत्यंत अजब वाटत होते, याचमुळे मला हा टॅटू आवडल्याचे ऑरोरा सांगतो.

संमिश्र प्रतिक्रिया

ऑरोराच्या इन्स्टाग्रामवर 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यातील अनेकांना तिचा हा लुक चांगला वाटतो, तर काही जणांना भीतीदायक वाटतो. ऑरोरा आता माशाप्रमाणे वाटतेय असे एका युजरने नमूद केले आहे. तर काही वर्षांमध्ये ती स्वत:च्या या लुकला कंटाळेल आणि स्वत:चा चेहरा बदलण्याचा विचार करू लागेल अशी चिंता काही जणांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.