Solapur : प्रेमप्रकरणातून तरुणीचा निघृणपणे गळा कापून खून
प्रेमविवादात अक्कलकोटमध्ये भीषण खून
अक्कलकोट : प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरुणीचा निघृणपणे गळा कापून खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी १०.३० ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास येथील बासलेगाव रोड, लोखंडे मंगल कार्यालयाच्या मागे पिरजादे प्लॉटमधील कोळी याच्या घरात घडली. यावेळी सोबत असलेला तरुण स्वतः देखील गळा कापून घेऊन जखमी झाला. स्नेहा श्रीकांत बनसोडे (रा. रामवाडी, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आदित्य रमेश चव्हाण (रा. नागुर तांडा, तालुका अक्कलकोट) जसे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरुणावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तरुणीचा मृतदेहउत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. फिर्यादीची मृत मुलगी स्नेहा ही मागासवर्गीय असून आरोपी चव्हाण यास माहीत असताना सुद्धा त्याने मृत तरुणीसाबत प्रेमसंबंध ठेवून धारदार तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून तिचा खून केला. मृत मुलीची आई शाळेत शिपाई म्हणून काम करते तर त्या तरुणीचे वडील १५ वर्षांपूर्वी मरण पावलेले आहेत.
शिक्षणासाठी मृत स्नेहा ही मैत्रर्गी येथे राहण्यास होती. मैंदर्गी येथे शिक्षणास असताना मैंदर्गी गावाजवळील नागूरतांडा येथील आदित्य रमेश चव्हाण याची मृत तरुणीशी ओळख झाली. मोबाईलवर फोन करून त्या तरुणाने तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे म्हणत होता, असे मुलीने सांगितल्याने आई त्या
मुलावर लक्ष ठेवूनच होती. तसेच घराजवळून फिरताना माझ्यामुलीच्या नादाला लागू नको, तू तिच्या सोबत बोलू नको, तुझ्यासोचत मुलीचे लग्न लावून देणार नाही, असे सांगितले होते. परंतु रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आई शाळेतून घरी आली.
त्यावेळी मुलगी स्नेहा घरात दिसली नाही. त्यावेळी दुसरी मुलगी प्रतीक्षा हिला स्नेहा कोठे गेली आहे असे विचारल्यावर सांगितले की, स्नेहा ही नवीन वर्ष बालू आल्याने श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला दर्शनाकरिता जाऊन येते असे मला सांगून गेली असल्याचे मुलगी प्रतिक्षा हिने सांगितले. त्यानंतर शेजारी राहणारी जाधव यांनी तुमची मुलगी स्नेहा हिचा अक्कलकोट येथे पातपात झाला असून तिला अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आई व नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये पोहचले. परंतु उपचारापूर्वीच स्नेहा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.