भररस्त्यात तरुणीला मारहाण
कोल्हापूर :
शहरातील दसरा चौकालगत एकतर्फी प्रेमातून तऊणीवर अत्याचार करीत, तिला आणि तिच्या लहान भावाला एका तऊणाने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी दहाला घडली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मृणाल सुनील माने (वय 29, रा. पंचगंगा तालीमजवळ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या संशयिताचा तत्काळ शोध घेऊन अटक केली.
संशयित मृणाल माने हा पीडित तऊणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. शनिवारी सकाळी पीडित तऊणी आणि तिचा लहान भाऊ शहरातील दसरा चौकालगतच्या एका हातगाडीनजीक थांबले होते. यावेळी संशयित मृणाल माने त्या ठिकाणी आला. त्याने पीडितेचा हात धऊन, तु माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणू लागला. यावेळी पीडितेने त्याला नकार दिला असता, त्याने पीडितेवर अत्याचार करीत, तिला भररस्त्यात मारहाण कऊ लागला. यावेळी तिच्या मदतीला लहान भाऊ धावला. त्यालाही संशयिताने लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याने घटनास्थळावऊन पलायन केले. या प्रकरणी पीडितेने लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावऊन पोलिसांनी गुन्हा दाखल कऊन, संशयित मानेचा शोध घेऊन त्याला अटक केली.