For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्वत:चेच रक्त प्राशन करायचा युवक

07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्वत चेच रक्त प्राशन करायचा युवक
Advertisement

विचित्र कृत्यामुळे झाली रिअॅक्शन विचित्र कृत्यामुळे झाली रिअॅक्शन

Advertisement

रशियात एक युवक स्वत:च्या शरीरातील रक्त काढून ते प्राशन करत होता. परंतु यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. कारण स्वत:च्या शरीरातून काढलेले रक्त पिल्यावर विष प्राशनासारखी लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येत होती. सोशल मीडियावर सध्या अशाप्रकारचे कंटेंट समोर येत असतात, ज्यामुळे प्रेरित होते कमी वयाचे युजर्स त्यांना फॉलो करण्यास सुरुवात करतात. अनेकदा हे मूर्खपणाचे असते, यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असते. याचे एक उदाहरण रशियाच्या मॉस्को येथून समोर आले आहे. तेथील एका 17 वर्षीय युवकाने इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिल्यावर स्वत:च्या शरीरातून रक्त काढत पिण्यास सुरुवात केली होती. या युवकाने सिरिंजद्वारे रक्त काढत ते पिण्यास सुरुवात केली होती. स्वत:च्या शरीरात आयर्न आणि हीमोग्लोबिनचा स्तर वाढावा म्हणून मी हे करत होते. यासंबंधी मी एक ऑनलाइन व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओत स्वत:चे रक्त पिल्याने हीमोग्लोबिनची पातळी वाढू शकते असा दावा करण्यात आला होता, असे या युवकाने सांगितले आहे.

सिरिंजचा वापर

Advertisement

किशोरवयीनाने सिरिंजद्वारे स्वत:चे रक्त बाहेर काढत त्याचे सेवन केले होते. यामुळे शरीरात आयर्नचा स्तर वाढून आपण मजबूत होऊ, असे त्याला वाटले होते. परंतु गोष्टी त्याच्या योजनेनुसार घडल्या नाहीत. काही काळानंतर युवकाची प्रकृती बिघडू लागली, त्याला अस्वस्थ वाटू लागले, रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि ताप येऊ लागला. त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने कुटुंबीयांनी आपत्कालीन सेवांना पाचारण केले.

उपचारानंतर प्रकृती स्थिर

डॉक्टरांना युवकाची प्रकृती स्थिर करण्यास यश मिळविले, परंतु संशयास्पद विषाचे कारण समजल्यावर ते स्तब्ध झाले. सोशल मीडियावर रक्त पिल्याने आयर्नचा स्तर वाढू शकतो असा सल्ला देण्यात आला होता, असे त्याने सांगितले. परंतु तो अशाप्रकारच्या कृत्यांच्या धोक्यांपासून अजाण होता, खासकरून दीर्घकाळापर्यंत असे करत राहिल्याने.

विष भिनण्यासारखी लक्षणे

डॉक्टर आंद्रेई केंड्राखिन यांनी रक्त प्राशनामुळे विषाक्ततेची लक्षणे होऊ शकतात, कारण मानवी पोट रक्त पचविण्यासाठी सक्षम नाही, असे सांगितले आहे. रक्तात आयर्नचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते अवशोषित होत नाही. याचमुळे जळजळ निर्माण होते. रक्ताचा तरल हिस्सा (प्लाझ्मा) शरीराच्या पचनतंत्रातून जाण्यासाठी तयार झालेला नाही. याचमुळे शरीर रक्त पचवू शकत नाही. ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया असल्याचे डॉक्टर कोंड्राखिन यांनी सांगितले आहे. शरीर अशाप्रकारे हीमोग्लोबिनमध्ये असलेले आयर्न प्राप्त करू शकत नाही. ही एक अत्यंत जटिल आणि दीर्घ प्रक्रिया आहे. याचमुळे केवळ उलटी होऊ शकते आणि कुठलाच लाभ मिळत नसल्याचे डॉक्टर कोंड्राखिन यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.