For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खून करून मृतदेह लटकविला झाडाला

11:35 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
खून करून मृतदेह लटकविला झाडाला
Advertisement

मोदगा येथील प्रकाराने खळबळ, आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : मोदगा (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तो आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. ऐन गणेशोत्सवात झालेल्या गूढ खुनाच्या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रवी निंगनगौडा पाटील (वय 32 रा. बसवण गल्ली, मोदगा) असे त्याचे नाव आहे. रवीचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. खुनानंतर शेतवडीतील आंब्याच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकविण्यात आला होता. शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. रवीची आई ज्योती निंगनगौडा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता 103, 238 (ए) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेला रवी हा सोमवार दि. 9 सप्टेंबरच्या सायंकाळी 5.30 पासून बेपत्ता होता. सर्वत्र त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी मोदगा येथील अशोक कल्लाप्पा मारिहाळ यांच्या शेतवडीतील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत रवीचा मृतदेह आढळून आला. खून करून आत्महत्या भासविण्यासाठी मारेकऱ्यांनी त्याला आंब्याच्या झाडाला लटकविल्याचे उघडकीस आले आहे. कोणत्या तरी शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह दोरीने आंब्याच्या झाडाला लटकविण्यात आला आहे. या युवकाचा चेहराही विद्रुप करण्यात आला आहे. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.