गावठी पिस्तुल कमरेला लावून उचगाव ते गडमुडशिंगी दरम्यान फिरणाऱ्या तरुणाला अटक
गांधीनगर पोलिसांची कारवाई, पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाच हजार रुपये बक्षीस जाहीर
उचगाव/ वार्ताहर
करवीर तालुक्यातील कोल्हापूर हूपरी रस्त्यावर उचगाव ते गडमुडशिंगी दरम्यान गावठी पिस्तुल कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड किंमत अंदाजे २५,५००/- जप्त केला. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. विशाल जयकर कांबळे (वय.३८, रा.ख्रिचन वसाहत,विक्रमनगर,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.दरम्यान गांधीनगर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ५००० चे बक्षीस जाहीर केले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करवीर तालुक्यातील उचगाव ते गडमुडशिंगी रस्त्यावर एक तरुण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बजरंग हेब्बाळकर, संदीप कुंभार, सचिन सावंत, संतोष कांबळे या टीम ने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी उचगाव येथील रोहिणी बेकरी समोरील रस्त्यावर विशाल कांबळे हा तरुण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी कट्टासह एक जिवंत राउंड पोलिसांनी जप्त केला.याबाबत गांधीनगर पोलिसांत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कुंभार यांनी फिर्याद दिली.विशाल कांबळे यास हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर करीत आहेत.