For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगावात मशिदप्रकरणावरून अली खानजादे युवकाचा खून

01:06 PM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मडगावात मशिदप्रकरणावरून अली खानजादे युवकाचा खून
Advertisement

फातोर्डा पोलिसांनी काहीजणांना केली अटक

Advertisement

मडगाव : शुक्रवारी दुपारी घोगळ - मडगाव येथे अली खानजादे या युवकाचा सुरा खुपसून खून करण्यात आला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी काहीजणांना अटक केली आहे तर आणखी काही जणांना अटक करण्याच्या तयारीत आहेत. मशिदीच्या प्रकरणावरुन हा खुनाचा प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरा खुपसल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या अली खानजादे या युवकाला मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा एक गटाने पवित्रा घेतलेला आहे तर दुसरीकडे या प्रकरणातील सर्व संशयित आरोपीना अटक करण्यात येईल, असे दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. अटक केलेल्या संशयितांविरुद्ध खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.