खरं बोलण्याच्या आजारामुळे युवकाने गमावल्या अनेक नोकऱ्या
डोक्याला झालेली ईजा ठरली आपत्ती
जीवनाच्या मार्गात एक छोटीशी दुर्घटना देखील माणसाचे पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलून टाकते. कधीकधी शारीरिक घाव भरून जातात, परंतु मेंदूत झालेली ईजा माणसाचे सामाजिक वर्तन आणि बोलण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकते. इंग्लंडच्या ग्लॉस्टर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय निकोलस एथर्टनसोबत काही असेच घडले आहे. एका दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली, तो यातून वाचला, परंतु याला डोक्यावरील ईजेनंतर त्याला सत्य बोलण्याचा आजार जडला, यामुळे त्याला एका मागोमाग एक अनेक नोकऱ्यांमधून त्याला काढून टाकण्यात आले. याचबरोबर या दुर्लभ लक्षण म्हणजेच ‘नो फिल्टर’ वर्तनामुळे आता त्याला कुणी नोकरीवरून ठेवून घेऊ इच्छित नाही.
निकोलस एथर्टनसाठी मागील काही वर्षे एखाद्या दुस्वप्नापेक्षा कमी राहिली नाहीत. एका भीषण कार दुर्घटनेनंतर त्याला गंभीर ब्रेन इंजरी झाली होती. या ईजेचा सर्वात अजब आणि आव्हानात्मक प्रभाव हा राहिला की निकोलसची ‘इनहिबिशन’ म्हणजेच स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची क्षमता संपुष्टात आली. वैद्यकीय शास्त्रात याला ‘लॅक ऑफ इनहिबिशन’ म्हटले जाते, ज्यात व्यक्ती डोक्यात येईल त्या गोष्टी विचार न करता सर्वकाही बोलून टाकतो. मी माझ्या कामात अत्यंत चांगला होतो आणि फ्रंट डेस्कवर अतिथींचे स्वागत करणे मला अत्यंत पसंत होते, परंतु एकेदिवशी माझ्या डोक्यात काही गोष्टी आल्या आणि मी कुठलाही विचार न करता त्या बोलून मोकळा झालो असे निकोलस सांगतो.
एका महिला कर्मचाऱ्याने जेव्हा मला मदत केली, तेव्हा मी तिला अजाणतेपणी ‘गुड गर्ल’ म्हटले, यामुळे ती दुखावली गेली. अशाचप्रकारे मी जेव्हा दोन सहकाऱ्यांना एकत्र पाहिले, तेव्हा त्यांना ते ‘कडल बडीज’ आहात का अशी विचारणा केली. अशा स्थितीत माझ्या सहकाऱ्यांनी याला अभद्र आणि अपमानास्पद मानून माझी तक्रार केली, ज्यानंतर मला नोकरीवरून काढून टाकण्या आल्याचे निकोलसने सांगितले आहे.
माहितीला प्रोसेस करण्याची पद्धत
हे सर्व माझ्यावर अन्याय करणारे आहे. मी मुलाखतीदरम्यानच नियुक्तीदाराला स्वत:च्या स्थितीविषयी सांगत असतो. परंतु कंपन्या स्वत:च्या उर्वरित स्टाफला याविषयी शिक्षित करू शकत नाहीत. कधीकधी मी सिनियर्ससमोर स्वत:चे डोळे फिरवितो, ज्याला शिस्तभंग मानले जाते. परंतु ही माझी माहितीला प्रोसेस करण्याची स्वत:ची पद्धत असल्याचे त्याचे सांगणे आहे.
215-17 पर्यंत उपचार
2015-17 पर्यंत ब्रिस्टलच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचार करविल्यावर निकोलसने पुन्हा चालणे शिकले आणि स्वत:च्या कामावर परतला. निकोलसला मागील नोकरीत ‘जादूगार’ म्हटले जात होते, कारण तो अतिथींचे स्वागत करण्यात तरबेजा होता. कंपन्यांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना शिक्षित करायला हवे, जेणेकरून निकोलसचा उद्देश कुणाला ठेच पोहोचविण्याचा नव्हता हे ते समजू शकतील असे त्याची आई एन एथर्टन यांनी म्हटले आहे.
अनेक लक्षणे सामील
क्रोनिक ट्रॉमेटिक एन्सेफॅलोपॅथी (सीटीई) आणि ब्रेन इंजरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करते. यात मूड स्विंग्ज, व्यक्तिमत्त्वात बदल, कमकुवत स्मरणशक्ती आणि बोलताना अडखळणे यासारखी लक्षणे सामील असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. चॅरिटी संस्था ‘हेडवे ग्लॉस्टरशायर’च्या सीईओ जूली रीडर-सुलिवन यांच्यानुसार निष्पक्ष वातावरण निर्माण करणे ही नियुक्तीदाराची जबाबदारी असते, हे केवळ कुठल्याही चुकीच्या गोष्टीला माफ करण्याविषयी नव्हे तर अशास्थितीत कशाप्रकारे प्रतिक्रिया द्यावी असे कर्मचाऱ्यांना समजाविण्याविषयी असल्याचे सुलिवन यांचे सांगणे आहे.