कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दापोलीत विचित्र डंपर अपघातात तरुण ठार

03:28 PM Mar 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दापोली :

Advertisement

तालुक्यातील आगरवायंगणी बौद्धवाडी फाटा येथे दोन डंपरमध्ये झालेल्या विचित्र अपघातात डंपर चालक दिलीप निवणकर (39, वणौशी) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. अरुंद रस्त्यावर बाजू देण्यावरून दोन्ही डंपर चालकांमध्ये झालेल्या वादादरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला. या बाबत दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

आगरवायंगणी-दापोली रस्त्यावर गुरुवारी रात्री दोन डंपर समोरासमोर आले. येथे रस्ता अरूंद असल्यामुळे रस्त्याच्या खाली गाडी नेऊन कुणी दुसऱ्या डंपरला जाण्यास जागा द्यायची, यावरून दोन्ही डंपर चालकांमध्ये मोठा वाद झाला. दोन्हीही डंपर चालक रस्त्यावर उतरून एकमेकांशी वाद घालू लागले. यानंतर यातील दुसरा डंपर चालक ऋषी बारे (32, वणौशी) हा आपल्या गाडीत जाऊन बसला. याचदरम्यान दिलीप निवणकर यांचा ‘न्युट्रल’ असणारा डंपर जागेवरून पुढे आला व या दोन्ही डंपरच्या मध्ये असलेले दिलीप निवणकर अडकले गेले. यानंतर दुसऱ्या डंपरचा चालक कृषी बारे यांनी त्यांच्या डंपरमध्ये क्लिनर बाजूने जाऊन डंपर मागे घेतला व अडकलेल्या निवणकर यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 105 अन्वये करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article