For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'आपली ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी'! मित्रांना मेसेज करून तरुणाने कपाळावर मधोमध गोळी झाडून केली आत्महत्या; लग्न होत नाही आणि प्रेम करत असलेल्या तरुणीने....

12:44 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
 आपली ही शेवटची भेट  यानंतर भेटू पुढच्या जन्मी   मित्रांना मेसेज करून तरुणाने कपाळावर मधोमध गोळी झाडून केली आत्महत्या  लग्न होत नाही आणि प्रेम करत असलेल्या तरुणीने
Advertisement

पुणे : लग्न होत नाही आणि प्रेम करत असलेल्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केल्याच्या नैराश्येतून तरुणाने मित्रांना 'आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी', असा मेसेज करून स्वतःच्या कपाळावर मधोमध गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement

अक्षय कालिदास कांबळे (२६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना खराडीमधील तुळजाभवानी नगरमधील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा लक्ष्मण चव्हाण यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे हा भीमा कोरेगाव येथील स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होता. तो २७ ऑक्टोबर रोजी खराडी येथील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथील तिसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये मुक्कामाला होता. २९ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्याने खोली न उघडल्याने त्यांनी खोली उघडून पाहिले, तर अक्षय कांबळे याच्या हातात पिस्टल होते व तो खाली पडलेला होता. रिसेप्शनिस्ट जितेंद्र पाडी याने खराडी पोलीस ठाण्यात येऊन हे सांगितले. त्याबरोबर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. अक्षय कांबळे याने दोन्ही हातांनी पिस्टल पकडलेले व उजव्या हाताचा अंगठा पिस्टलच्या एक्स्ट्रॅक्टरवर अडकलेला दिसून आला. त्याचे वडील आणि भाऊ विशाल कालिदास कांबळे यांनी अक्षय कांबळे याला ओळखले. त्याला सरळ करून पाहिले असता, त्याच्या कपाळावर मधोमध गोळी मारून घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

Advertisement

अक्षय कांबळे याचा विवाह होत नव्हता. तसेच त्याचे प्रेम असलेल्या तरुणीने दुसऱ्याबरोबर विवाह केल्याचे सांगितले जाते. त्या नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. त्याने आत्महत्या करण्यावरून आपल्या मित्रांना शेवटचा मेसेज केला होता. त्यात त्याने 'आपली ही शेवटची भेट, त्यानंतर पुढच्या जन्मी आता भेटू', अशा आशयाचा मेसेज केला होता. अक्षय कांबळे याच्याकडे हे विनापरवाना पिस्टल कोठून आले? त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय? याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

Advertisement
Tags :

.