For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Suicide Case | सोलापुरात आईशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाची आत्महत्या

04:36 PM Apr 27, 2026 IST | NEETA POTDAR
solapur suicide case   सोलापुरात आईशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाची आत्महत्या
Advertisement

               विठ्ठल-रुक्मिणी नगरातील तरुणाने राहत्या घरी संपवली जीवनयात्रा

Advertisement

सोलापूर :आईबरोबरबाद झाल्याने तरूणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास होटगी रोडवरील विठ्ठल-रुक्मीणी नगरात घडली. शिवकुमार गोविंद कोरे (वय २४, रा. विठ्ठल-रुक्मीणी नगर, होटगी रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

२५ एप्रिल रोजी सायंकाळी शिवकुमार याचा त्याच्या आईबरोबर बाद झाला होता. या वादाच्या रागातून शिवकुमार याने राहत्या घरी पत्र्याच्या बाशाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच नातेवाईकांनी शिवकुमार यास गळफासातून खाली उतरवून काका धनंजय कोरे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉ क्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.