तरुणाने केला आईवर जीवघेणा हल्ला
आगरवाडा येथील दुर्दैवी घटना
पेडणे : ज्या आईने मुलाला जन्म दिला, त्याच आईवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रसंग 15 रोजी आगरवाडा येथे घडला असून या हल्ल्याप्रकरणी चंद्रशेखर चंद्रकांत पाटील उर्फ संजू या युवकाला अटक करण्यात आली आहे. मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुषमा कळंगुटकर ही 50 वर्षीय महिला आगरवाडा येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. पंधरा रोजी तिचा मुलगा चंद्रशेखर चंद्रकांत पाटील याने तिच्यावर कोयत्याने वार केला. सुऊवातीला रागाच्या भरात संजूने आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तिच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि इतर ठिकाणी कोयत्याने सपासप वार केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बांबोळी येथे गोमेकॉत उपचार सुरू आहेत.या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी संजू विऊद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 352, 351, (3 )आणि 109 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.