For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय युवा संघाची सरशी

06:39 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय युवा संघाची सरशी
Advertisement

यशवर्धन चौहानच्या शतकामुळे 19 वर्षांखालील संघाचा दुसऱ्या सामन्यात 103 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था, राजकोट :

यशवर्धन चौहानची 122 धावांची खेळी व व्ही. के. विनीतच्या 87 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या 19 वर्षांखालील दुसऱ्या एकदिवसीय लढतीत 103 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Advertisement

चौहानचे शतक, विनीतचे अर्धशतक आणि आर्यवीर सेहवाग (47) व कुशाग्र ओझा (34) यांचे महत्त्वपूर्ण योगदान यांच्या जोरावर भारताच्या 19 वर्षांखालील संघाने निरंजन शाह स्टेडियमवर आधी खेळताना 7 बाद 341 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरार्थ पाहुण्या संघाचा डाव 41.1 षटकांत अवघ्या 238 धावांत आटोपला. पावसामुळे 20 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेला पहिला सामना भारताने सात धावांनी जिंकला होता. आज बुधवारी येथे तिसरा आणि अंतिम सामना खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ प्रत्येकी चार दिवसांच्या दोन युवा कसोटी सामन्यांत आमनेसामने येतील.

मोठ्या धावसंख्येचे रक्षण करताना भारताने ऑस्ट्रेलियावर दबाव कायम ठेवण्यासाठी सात वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केला. गोलंदाजांमध्ये चिगुऊपती वेंकटने 64 धावांत 3 बळी अशी सर्वोत्तम कामगिरी केली, तर काव्य पटेल आणि चौहान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहित उल्वा, मानल चौहान आणि यशवीर गौड यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवला. भारताची सुऊवात दमदार झाली, ज्याचे श्रेय प्रामुख्याने सेहवागच्या आक्रमक खेळीला जाते. मात्र वैयक्तिक मैलाचा दगड गाठण्यापासून हा उजव्या हाताचा फलंदाज थोडक्यात हुकला.

कर्णधार लक्ष्य रायचंदानी (11) याच्यासोबत सलामीला 46 धावांची भागीदारी केल्यानंतर सेहवागने विनीतसोबत दुसऱ्या गड्यासाठी आणखी 55 धावा जोडल्या. त्यानंतर तो धावबाद झाला. मात्र पहिल्या सामन्यात 18 चेंडूंत 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या अन्वय द्रविडसाठी हा सामना निराशाजनक ठरला. भारतीय डावाच्या उत्तरार्धात धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात हा यष्टिरक्षक-फलंदाज अवघ्या नऊ धावांवर बाद झाला. चौहान व विनीत यांच्या खेळींनी भारताला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 132 धावांची भागीदारी केली. या दोघांमध्ये चौहान अधिक आक्रमक राहिला. त्याने 100 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या, तर विनीतने 92 चेंडूंत सहा षटकार व चार चौकारांसह 87 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरार्थ ऑस्ट्रेलियाच्या संघाला सुऊवातीलाच उल्वा आणि वेंकट यांनी धक्के दिले. मॅथ्यू लॉफ (42), कर्णधार जॅक झोस्नेक (63 चेंडूंत 81 धावा) आणि ब्लेक कॅटल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी पाहुण्या संघासाठी हे लक्ष्य गाठणे कठीण ठरले. भारताने नियमित अंतराने बळी घेत पाहुण्या संघाचा डाव 238 धावांत गुंडाळला आणि आठहून अधिक षटके बाकी असताना विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 7 बाद 341 (व्ही .के. विनीत 87, यशवर्धन चौहान 122, थॉमस वासिओ 3/78), ऑस्ट्रेलिया 41.1 षटकांत सर्व बाद 238 (जॅक झोस्नेक 81, चिगुऊपती वेंकट 3/64).

Advertisement
Tags :

.