For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लोकोत्सवा’त युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे

03:16 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘लोकोत्सवा’त युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे
Advertisement

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रशंसोद्गार, आमोणे - काणकोण येथे आयोजित लोकोत्सवाचा शानदार समारोप

Advertisement

काणकोण : काणकोणचा लोकोत्सव हा युवक-युवतींना खूप काही शिकण्यासारखा असून प्रजेचे कार्य हेच मुख्य कार्य मानून काम करणाऱ्यांची समाज नेहमीच आठवण ठेवत असतो. यापुढे विज्ञान व तंत्रज्ञानावर पकड असलेला आपला देश असेल, असे उद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकोत्सव 2023 च्या समारोपप्रसंगी मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर बोलताना काढले. या समारंभाला सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सरपंच सविता तवडकर, आनंदू देसाई, सेजल गावकर, प्रीतल फर्नांडिस, बलराम शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. समारोपाच्या दिवशी कला आणि संस्कृती खात्याचे साहाय्यक स्ंाचालक अशोक परब, सुकूर क्वाद्रुस, विपुल खंवटे, आवदा व्हिएगश, डॉ. भूषण पावस्कर, सुधाकर गावकर, मीनानाथ उपाध्ये, समीर मोरजकर, आनंद वागुर्मेकर, प्रदीप नाईक, आलोविया ओलिव्हेरा यांचा श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

वादळाला घाबरण्यापेक्षा आम्हीच वादळ बनूया असे सांगून आदर्श युवा संघाचे संस्थापक असलेले सभापती रमेश तवडकर यांनी लोकोत्सवाच्या माध्यमातून मनुष्यबळ घडविण्याची तयारी प्रास्ताविकातून व्यक्त केली. यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर, चंद्रकांत कवळेकर, आमदार उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर यांनी लोकोत्सवाच्या कार्यकर्त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. सकाळच्या सत्रात आसाम विधानसभेचे सभापती विश्वजित दायमारी, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते. यावेळी प्रेम कुमार (आयएफएस), शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, ब्रह्मकुमारी सुरेखा, सागर साकोर्डेकर, सुनीत देसाई, अजित मिराशी, जयानंद हंबीर दरेकर, गजमल पवार, विठ्ठल मारपे यांचा सभापती विश्वजित दायमारी आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर, जानू तवडकर, श्रीकांत तवडकर, दामोदर वेळीप, बलराम निवासी शाळेच्या शिक्षिका आणि अन्य कार्यकर्त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मागच्या 22 वर्षांचा लेखाजोगा पाहता यंदाच्या लोकोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला असून आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते, बलराम शिक्षणसंस्थेचे सर्व कर्मचारी, भाजपाच्या काणकोण मंडळाचे पदाधिकारी यांचे नियोजन आणि संघटनशक्ती यामुळे हा लोकोत्सव यशस्वी झालेला आहे. आतापासूनच 2024 च्या लोकोत्सवाच्या तयारीला आपले कार्यकर्ते लागलेले आहेत. दोन वर्षांनी हा लोकोत्सव रौप्यमहोत्सव साजरा करणार असून त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकोत्सवाचे आयोजन करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने तयारीला कार्यकर्ते लागले आहेत, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.