महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जाखलेत बैल उधळल्याने छकड्यातून पडून तरुण शेतकरी ठार : घटनेने परिसरात हळहळ

10:50 AM Feb 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
running bull Jakhle
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

जाखले ता. पन्हाळा येथे शेतातील तोडलेल्या ऊसाचे वाडे - वैरण (एक्का गाडी) छकड्यातून घेवून जात असताना बैल उधळल्याने छकड्यातून पडून तरूण शेतकरी जागीच ठार झाला आहे अभिजीत यशवंत भोसले वय ३० रा. जाखले. पन्हाळा असे त्याचे नाव आहे.
आज शनिवार दि. ३ रोजी सकाळी ८.३० पुर्वी शेतात घटना घडल्यावर घडली.

Advertisement

अभिजीत यास तात्काळ स्थानिक नागरिकानी उपचारासाठी उपजिल्हा रुग्नालय कोडोली ता. पन्हाळा येथे आणले होते. त्यास तपासून उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. खराडे यानी घोषीत करून कोडोली पोलीस ठाण्यात या घटनेची स्वत्ता वर्दी दिली तर याबाबतची माहिती जाखले गावच्या पोलीस पाटील उजाला अजित पाटील यांनी कोडोली पोलीसांन दिली.  बैल उधळल्याने छकड्यातून थेट रस्त्यावर बाजूला दगडावर पडल्याने अभिजीत यास डोक्याला गंभीर जखम झालेली होती त्यास नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांनी औषधोपचाराकरीता उपजिल्हा रुग्नालय कोडोली येथे घेऊन आले होते या बाबत पुढील तपास पोलीस हावलदार परीट, कुंभार,पो.कॉ.मोळके तपास करीत आहेत. अभिजीत च्या पश्चात आई- वडील आणि बहीण असा परिवार आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
bull Jakhlefell downfence and diedyoung farmer f
Next Article