सेवा माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार
युवा उद्योजक विशाल परब यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन
वेंगुर्ले । प्रतिनिधी
आयुष्यात चढाव उतार हे यायचेच. परंतु हे जीवन म्हणजे जणू क्रिकेट आहे, थांबला तो हुकला. सेवा हेच संघटन ही शिकवण घेऊन मी माझ्या सामाजिक जीवनात वावरलो. गोरगरिबांची सेवा हाच माझ्या रक्ताचा धर्म असून तो आयुष्यभर जपणार, आता थांबणार नाही. चांगल्या कामात परमेश्वर मला निश्चितपणे बळ देईल असा पूर्ण विश्वास आहे असे प्रतिपादन युवा उद्योजक विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे केले . विशाल सेवा फाउंडेशन आणि विशाल परब मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम केला यावेळी ते बोलत होते . यावेळी रुग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयाला वॉशिंग मशीन सप्रेम भेट म्हणून देण्यात आली . श्री केतन आजगावकर, प्रशांत नाईक, गणपत राऊळ , अजित नाईक, सचिन शेट्ये, राजू रगजी, श्रीकांत राजाध्यक्ष, दीपेश केरकर, बाबू टेमकर, निलेश मांजरेकर,साईप्रसाद नाईक, राजेश करंगुटकर, प्रसाद शिंदे,संदीप गावडे, विनायक मांजरेकर आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांच्यासह डॉक्टर गणेश गुट्टे, डॉक्टर निखिल, इन्चार्ज सिस्टर श्रीमती पी.एफ. डिसोजा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.