For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फसवणूक झाल्याने पुण्यात डॉक्टर तरुणीची आत्महत्या

12:37 PM Jan 21, 2025 IST | Pooja Marathe
फसवणूक झाल्याने पुण्यात डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Advertisement

अविवाहीत असल्याचे सांगून तरुणाकडून फसवणूक
तरुण विवाहित असून बायको प्रेग्नंट
पुणे
डॉ. पल्लवी पोपट फडतरे असे या तरुणीचे नाव आहे. पल्लवीची एका तरुणाकडून फसवणूक धझाल्याने तिने क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पहिलं लग्न झाले असतानाही अविवाहित असल्याचे भासवून एका तरुणाने डॉ पल्लवीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून तब्बल दहा लाख रुपये उकळले. यानंतर डॉ. तरुणीने लग्नाकरण्याविषयी विचारल्यावर मात्र, त्याने मी विवाहीत असून आपली पत्नी गर्भवती असल्याचेही सांगितले. हा धक्का सहन न झाल्याने डॉ तरूणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, असल्याचे पुढे आले आहे. डॉ. तरुणीने विषारी औषधं पिऊन स्वतःच्याच क्लिनिक मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉ. पल्लवीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत तरुणीचे वडील पोपट बाबुराव फडतरे यांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
कुलदिप सावंत याचे लग्न झालेले असूनही त्याने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर अविवाहीत असल्याचे भासवून लग्नासाठी नोंदणी केली. यानंतर कुलदिप हा डॉ. पल्लवीच्या घरांच्याना भेटला. त्याचे वागणे पाहून डॉ. पल्लवीच्या वडिलांनी नकार दिला होता. तरीही कुलदिपने डॉ. पल्लवीशी संपर्क साधला. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. विविध कारणांतून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. आणि जेव्हा पल्लवीने लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने आपले सत्य पल्लवीला सांगितले. पल्लवीला याचा मोठा धक्का बसला. तिने कुलदिपकडे जेव्हा १० लाख रुपये परत देण्यासा सांगितले तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. डॉ. पल्लवीला मानसिक तणाव सहन न झाल्याने पल्लवीने टोकाचे पाऊच उचलले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.