For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sindhudurg | कोकणच्या युवा कलाकाराने कॅनव्हासवर साकारली 'पंढरीची सोहळ्याची अमेरिका वारी'

05:26 PM Jul 10, 2026 IST | NEETA POTDAR
sindhudurg   कोकणच्या युवा कलाकाराने कॅनव्हासवर साकारली  पंढरीची सोहळ्याची अमेरिका वारी
Advertisement

परुळे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा डिजिटल कलाकार अल्पेश आत्माराम घारे यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि कलात्मक कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील एका ग्राहकासाठी त्यांनी तयार केलेल्या तीन भव्य डिजिटल कॅनव्हास पेंटिंग्ज आता अमेरिकेत पाठविण्यात येणार आहेत.

Advertisement

या कलाकृतींपैकी ८ × ८ फूट आकाराचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर विराजमान असलेले भव्य चित्र, ९ × ५ फूट आकारातील पंढरपूरच्या विठ्ठल वारीचे भावपूर्ण चित्रण, तसेच ६ × ६ फूट आकारातील श्री योगेश्वरी देवी, अंबाजोगाई यांचे आकर्षक चित्र विशेष लक्षवेधी ठरले आहे.

महाराष्ट्राचा इतिहास, अध्यात्म, वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे अत्यंत बारकाईने आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेले हे चित्रसंग्रह अमेरिकेतील भारतीय संस्कृतीप्रेमींना आकर्षित करणारे ठरणार आहेत.

Advertisement

अल्पेश घारे हे डिजिटल मॅट पेंटिंग, कॉन्सेप्ट आर्ट आणि पारंपरिक भारतीय विषयांवरील भव्य कलाकृतींसाठी ओळखले जातात. त्यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, इतिहास आणि आध्यात्मिकतेचा प्रभावी संगम अनुभवायला मिळतो.

पाट हायस्कूल च्या कला दालनातही अल्पेश घारेच्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या आहेत . आज कला विषय शिकणाऱ्या मुलांना प्रेरणादायी आहेत असे कला शिक्षक संदीप साळसकर यांनी सांगीतले .सिंधुदुर्गच्या मातीतून जागतिक स्तरावर झेप घेतलेल्या या युवा कलाकाराच्या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.